महत्वाच्या बातम्या

 चाळीस प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचाऱ्यांना अन्नातून विषबाधा : आठ जण रुग्णालयात दाखल 


- मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चाळीस प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचाऱ्यांना अन्नातून विषबाधा झाले असून आठ पोलीस गंभीर आहेत त्यांचे मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहे.

गृह विभागाने काही महिन्या अगोदर पोलिस भरती घेतली. या भरतीत पात्र ठरलेले सुमारे २०० पोलिस कर्मचारी चंद्रपुरात प्रशिक्षणार्थी म्हणून पाठविण्यात आले आहेत. हे सर्व कर्मचारी पोलिस मुख्यालयात राहत असून, याच परिसरातील कॅन्टिनमध्ये सकाळ आणि रात्रीचे जेवण करीत असतात. रविवारी सकाळ पाळीत सुमारे ४० प्रशिक्षणार्थ्यांनी कॅन्टिनमध्ये जेवण केले. यानंतर काही प्रशिक्षणार्थ्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील आठ कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना उपचारानंतर सुटी देण्यात आली.

या घटनेची पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गंभीर दखल घेतली. तातडीने जेवणाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जेवणाचे नमुने घेण्यात आले आहेत. चंद्रपुरात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. डी-हायड्रेशनमुळे हा प्रकार घडल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण सकाळी त्यांच्या जेवणात चिकन बनविले होते. अशी माहिती मिळाली. परंतु, विषबाधेचे मुख्य कारण प्रयोगशाळेतील अहवालानंतर समोर येणार आहे. 





  Print






News - Chandrapur




Related Photos