विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिस दलाने जप्त केला मोठा नक्षली साहित्याचा साठा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  घातपाताच्या इराद्याने लपवून ठेवलेला नक्षल्यांचा साहित्य साठा गडचिरोली पोलिस दलाच्या हाती लागला आहे. पोलिसांनी नक्षल्यांचा मोठा कट उधळून लावला आहे.
पेंढरी जंगल परिसरात नक्षल्यांनी भुसुरूंगासाठी वापरण्यात येणारे साहित्य ठेवल्याची माहिती मिळाली. या माहितीपरून काल ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शोधमोहिम राबविण्यात आली. यावेळी सी - ६० कमोडोंना जंगलात पुरून ठेवलेले साळियत आढळून आले. यामध्ये १४ नग २ इंच मोटार सेल, १४ हॅंड ग्रेनेड, १५ किलो जिलेटीन, ५ ते ७  किलो जिवंत स्फोटके असलेला प्रेशर कुकर डिटोनेटरसह, १ कुकर बाॅंब आयईडीसह, वायर बंडल, नक्षली गणवेश, लाल व पांढऱ्या रंगाचे कापडी बॅनर, आरसीआयडी स्वीच, विद्युत साहित्य, पॅकींग साहित्य व लिखीत साहित्य आढळून आले.  या कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सी - ६० जवानांचे अभिनंदन केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-04


Related Photos