भाजपाकडून कामठी मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे ऐवजी पत्नी ज्योती बावनकुळे यांना तिकीट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
अनेक तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर चंद्रशेखर  बावनकुळे यांचा पत्ता कापण्यात आला आहे. भाजपकडून ज्योती चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट देण्यात आले आहे. कामठी मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
खडसे, तावडे आणि प्रकाश मेहतांच्या पाठोपाठ ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचाही पत्ता कापला गेला आहे. कामठी मतदारसंघातून त्यांच्याऐवजी त्यांची पत्नी ज्योती बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. 
मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गडकरींच्या घरी मुख्यमंत्र्यांसह शहरातल्या पाचही उमेदवारांसह बावनकुळे दिसले. बावनकुळेंबाबत मुख्यमंत्री आणि गडकरींमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा एक तास शिल्लक असताना या नाट्यमय घडामोडी घडल्या.  दरम्यान कामठी मतदारसंघातून  ज्योती बावनकुळे यांनी आज आपले नामांकन दाखल केले. 

   Print


News - Nagpur | Posted : 2019-10-04


Related Photos