महत्वाच्या बातम्या

 निधी खर्चात चंद्रपूर जिल्हा नियोजन राज्यातून अव्वल 


- सर्वाधिक ८६ टक्के 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्य शासनाने चालू वर्षी ३६ जिल्हा नियोजन समित्यांना १५ हजार १५० कोटी रुपयांचा निधी दिला होता. प्राप्त निधीतून आतापर्यंत ८९ टक्के निधी खर्च करण्यात आला. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीने सर्वाधिक ८६ टक्के निधी खर्च करून राज्यातून अव्वल स्थान पटकावले.
चंद्रपूरला मिळालेल्या ३८० कोटींपैकी ३२८ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे.

राज्य शासनाने २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून सर्वसाधारणकरिता १५ हजार १५० कोटींचा नियतव्यय मंजूर केला. त्यानुसार ३६ जिल्हा नियोजन समित्यांना मागणीनुसार शासनाने निधीही उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा नियोजन समित्यांनी कार्यालयीन यंत्रणांमार्फत आजपर्यंत ११ हजार ९८० कोटींचा खर्च केला आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त निधी खर्चात चंद्रपूर जिल्हा यंदा राज्यात अव्वल स्थानी आहे. चंद्रपूरसाठी चालू वर्षी सर्वसाधारण योजनेतून ३८० कोटी रुपये निधी देण्यात आला. त्यापैकी ३२८ कोटी रुपये (८६ टक्के) निधी खर्च केला आहे. यासाठी जिल्हा नियोजन समिती व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी शिस्तबद्ध प्रयत्न केल्याने निधी खर्चात यंदा आघाडी घेणे शक्य झाल्याची माहिती सूत्राने दिली.

निधी खर्चासाठी यंत्रणांची धावपळ : 
मार्च एन्डिंगची डेडलाइन लक्षात घेऊन राज्यभरातील जिल्हा यंत्रणांकडून शासकीय निधी खर्चाची घाई केली जाते. त्यासाठी विभाग प्रमुखांकडून संबंधित यंत्रणांवर मोठा दबाव असतो. यंदा मार्च एन्डिंगच्या काळातच येत्या दोन-तीन दिवसांत लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समित्यांपुढे उर्वरित निधी खर्चाचे आव्हान उभे ठाकले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos