दक्षिण-पश्चिम नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखल केला नामांकन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामांकन दाखल केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शहरातील भाजपच्या सहाही उमेदवारांनी नामांकन दाखल केले. यावेळी शक्तिप्रदर्शन करण्यात आले. भाजपचे निवडणूक प्रमुख भूपेंद्र यादव, राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सरोज पांडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते.
दक्षिण-पश्चिम नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पश्चिम नागपूर- सुधाकर देशमुख, पूर्व नागपूर- कृष्णा खोपडे, मध्य नागपूर- विकास कुंभारे, दक्षिण- मोहन मते आणि उत्तर नागपुरातून डॉ. मिलिंद माने अर्ज दाखल करणार आहेत. सर्व उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातून रॅली काढली . संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर रॅलीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नामांकन दाखल केले. यावेळी शहरातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी, नगरसेवक, मंडळ व बुथ पातळीवरील पदाधिकारी, मोर्चाचे प्रमुख आणि मतदारसंघातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेसच्या उमेदवारांनीही आज शुक्रवारी अर्ज दाखल केले. यामध्ये शहर अध्यक्ष विकास ठाकरे व गिरीश पांडव यांनी अनुक्रमे पश्चिम व दक्षिण नागपुरातून गुरुवारी अर्ज दाखल केले. उत्तर नागपुरातून नितीन राऊत, मध्य नागपुरातून बंटी शेळके आणि पूर्व नागपुरातून पुरुषोत्तम हजारे यांनी आपआपल्या मतदारसंघातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नामांकन दाखल केले.
News - Nagpur | Posted : 2019-10-04