महत्वाच्या बातम्या

 पोलीस स्टेशन कोठी येथे महिला मेळावा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : काल ०८ मार्च २०२४ रोजी पोलीस स्टेशन कोठी येथे निलोल्पल पोलीस अधीक्षक गडचिरोली, कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गडचिरोली, देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) गडचिरोली, रमेश अपर पोलीस अधीक्षक प्राणहिता (अहेरी) संकल्पनेतून तसेच अमर मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी, भामरागड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन कोठी च्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाले समुदाय आरोग्य अधिकारी, कोठी  शासकीय आश्रम शाळा कोठी येथील शिक्षिका ठाकरे आशा वर्कर जानो मडावी, गावपाटील कना हेडो कोठी, मासू लेखमी सदस्य व इतर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.

पोलीस हवालदार तेजराम मेश्राम यांनी प्रास्ताविक भाषण केले व प्रभारी अधिकारी सागर माने यांनी महिलांना पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून दील्या जाणाऱ्या योजनांची व महिला साठी असलेले विशेष कायद्यांची माहिती दिली. पोलीस उपनिरिक्षक गवळी यांनी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून बचत गटास भेटणाऱ्या लाभाची माहिती दिली व नंतर महिला मेळाव्या करिता लाभलेले रिजेश राज असिटंट कमांडंट CRPF/३७ बटालियन  यांनी त्यांचा भाषांनातून हद्दीतील समस्त महिलांना जागतिक महिला दिना निमित्याने  महिलांचे समा जतील महत्व व उच्च पदावर असणाऱ्या महिलांनी केलेल्या प्रगती बाबत महिती दिली.

कार्यक्रमास उपस्थीत महिलांना १९० साड्या पुरुष यांना १८ धोतर व २ हॉलीबॉल चे वाटप करण्यात आले. महिला मेळाव्या करिता हद्दीतील २७० ते ३०० च्या संखेने  महिला, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी उपस्थित नागरिकांना नाष्टाची व्यवस्था करण्यात आली होती. 

सदर महिला मेळावा यशस्वी होण्याकरिता जिल्हा पोलिस, CRPF व SRPF अधिकारी व अमलदार यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या  शेवटी  महिला पोलीस हवालदार यांनी उपस्थित महिलांचे व मान्यवरांचे आभार प्रदर्शन केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos