उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, जोरदार शक्तिप्रदर्शन होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज  शुक्रवार ४ ऑक्टोबर अंतिम दिवस  राहिला आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी प्रमुख उमेदवारांची त्या - त्या केंद्रावर गर्दी उसळणार  आहे.  गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रांसाठी गुरुवारी दिवसभरात  १५ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण अर्जांची संख्या १९ आहे.
 २७ सप्टेंबरपासून सुरू झालेली अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज संपुष्टात येईल. अर्ज मागे घेण्याची तारीख सोमवार, ७ ऑक्टोबर आहे. निवडणुकीची तारीख २१ ऑक्टोबर आहे.
आज  अहेरी विधानसभा क्षेत्रातून आमदार राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम , माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम , गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून आमदार डॉ. देवराव होळी, काँग्रेसच्या डॉ. चंदा कोडवते , शेकापच्या जयश्री वेळदा यांच्यासह आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी या तीनही मतदारसंघातून अनेक पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवारांचे नामांकन दाखल होणार आहेत.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-04


Related Photos