अहेरी विधानसभा क्षेत्रावर पुन्हा राकाँने ठोकला दावा, धर्मरावबाबांना उमेदवारी जाहिर


- एबी फार्मही मिळाले
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
अहेरी विधानसभा क्षेत्रात उलथापालथ सुरूच असून काल रात्री उशिरा काॅंग्रेसने दीपक आत्राम यांना उमेदवारी जाहिर केल्यानंतर राकाॅंने अहेरी विधानसभा क्षेत्रावर आपला दावा ठोकला असून आज तिसऱ्या यादीत धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी जाहिर केली आहे. तसेच पक्षाने एबी फार्मसुध्दा दिले आहे. यामुळे आता दीपक आत्राम कोणत्या चिन्हावर निवडणूक लढतात याकडे लक्ष लागले आहे.
काल २ ऑक्टोबर रोजी भाजपाने विद्यमान आमदार राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची उमेदवारी जाहिर केली. तसेच काॅंग्रेस - राकाॅंची युती असताना व अहेरी विधानसभा क्षेत्र राकाॅंच्या ताब्यात असताना दीपक आत्राम यांना काॅंग्रेसने उमेदवारी दिली होती. यामुळे धर्मरावबाबा आत्राम अपक्ष लढणार काय, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र ऐनवेळी राकाॅंने पुन्हा अहेरी विधानसभा क्षेत्र आपल्या ताब्यात घेत धर्मरावबाबांचे नाव जाहिर केले आहे. आता या विधानसभा क्षेत्रातून काॅंग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रयत्नात असलेले दीपक आत्राम यांची उमेदवारी काॅंग्रेसकडून रद्दच झाल्यात जमा आहे. यामुळे दीपक आत्राम आता कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-03


Related Photos