अखेर दीपक आत्राम यांना अहेरी विधानसभेसाठी काॅंग्रेसकडून उमेदवारी


- धर्मरावबाबा आत्राम यांना अपक्ष लढावे लागणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गेल्या काही दिवसांपासून अहेरी विधानसभा क्षेत्रात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू होत्या. अखेर काल २ ऑक्टोबर रोजी विविध चर्चांना लगाम लागला असून भाजपाने आमदार राजे अम्ब्रीशराव आत्राम यांना उमेदवारी जाहिर केली. लगेच काॅंग्रेसनेही आपली दुसरी यादी जाहिर करीत यामध्ये अहेरी विधानसभा क्षेत्राकरीता दीपक आत्राम यांना उमेदवार घोषीत केले. यामुळे भाजपाकडून तिकीट मिळविण्याच्या प्रयत्नात राहिलेले धर्मरावबाबा आत्राम यांना आता अपक्ष रिंगणात उतरावे लागणार आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्र काॅंग्रेस - राकाॅं युतीमध्ये राष्टवादी काॅंग्रेससाठी ठेवण्यात आले होते. मात्र राकाॅंचे नेते धर्मरावबाबा हे भाजपाकडून तिकीट मिळविण्याच्या प्रयत्नात होते. काल २ ऑक्टोबर पर्यंत राकाॅंकडून या जागेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. तसेच धर्मरावबाबा आत्राम यांचे तळ्यात - मळ्यात सुरू असल्याने अहेरीची जागा काॅंग्रेसला देण्याची मागणी करू असे काॅंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते. अखेर काल भाजपाने धर्मरावबाबा ऐवजी राजे अम्ब्रीशराव आत्राम यांना उमेदवारी जाहिर केल्यानंतर काॅंग्रेसने दीपक आत्राम यांना उमेदवारी दिली. यामुळे आता या मतदारसंघात राकाॅंच्या चिन्हावर धर्मरावबाबा आत्राम निवडणूक लढवू शकणार नाहीत. या मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागणार असून तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-03


Related Photos