महत्वाच्या बातम्या

 पानी फाऊंडेशन द्वारे आयोजीत सत्यमेव जयते फार्मर कप प्रशिक्षणाची प्रथम बॅच उत्साहात संपन्न


- जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते प्रथम बॅच चा समारोप

विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : पाणी फाउंडेशनच्यावतीने सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरीता प्रथमच वर्धा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्यासाठी प्रथम बॅचच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते समारोप करण्यात आला.

पानी फाउंडेशनने प्रायोगीक तत्वावर प्रथमच संपूर्ण वर्धा जिल्हाचा समावेश सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धे अंतर्गत केलेला आहे. स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकत्रित करणे, त्यांचे शेतकरी गट तयार करून सामूहिक शेतीला चालना यातून मिळणार आहे. या सामूहिक प्रयत्नातून शेतीवरचा खर्च कमी करणे व उत्पन्न वाढवणे तसेच शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देणे हा सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी जिल्हातील शेतकऱ्याना तीन दिवशीय निवासी प्रशिक्षण देण्यात येते. समुद्रपूर तालुक्यातील प्रथम बॅचने सेवाग्राम आश्रम येथे तीन दिवशीय निवासी प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणाच्या समारोपाला जिल्हाधिकारी राहुलजी कर्डीले, पानी फाउंडेशन चे मुख्य मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, वैदकीय जनजागृती मंच वर्धा चे डॉ. सचिन पावडे उपस्थित होते.

समारोपीय कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी यांच्या वतीने तीन प्रशिक्षणार्थी यांनी आपले प्रशिक्षणाविषयी मनोगत व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल करणारे प्रशिक्षण आहे तसेच गटाने एकत्र येऊन जर आम्ही शेती केली तर शेतीतील अनेक अडचणी आम्ही सोडवू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच आम्ही गावात वापस घेल्यानंतर नक्की गट तयार करणार आणि सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

समारोपाला मुख्य मार्गदर्शन म्हणून उपस्तीत असणारे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सर्व उपस्तीत शेतकऱ्यांना फार्मर कप ही मोठी संधी आहे आपल्या शेतीमध्ये सकारात्मक बदल करून सामूहिक प्रयत्नातून नवीन तंत्रज्ञानाची जोड देता येईल यासाठी सर्व जिल्हाप्रशासन आपल्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले व प्रयोगीक तत्वावर संपूर्ण वर्धा जिल्ह्याची निवड केल्याबद्दल त्यांनी पानी फाउंडेशनचे आभार मानून सर्व उपस्थिती शेतकऱ्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. अविनाश पोळ यांनी उपस्थित  शेतकऱ्यांना  प्रशिक्षणाविषयी मत जाणून घेऊन सेवाग्राम आश्रम येथून सुरू होत असलेली ही गट शेतीची चळवळ संपूर्ण वर्धा जिल्ह्यात व नंतर महाराष्ट्रात पोहचणार असल्याचे त्यांनी सांगीतले तसेच जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी प्रशिक्षणात सहभागी होऊन सत्यमेव जयते फार्मर कप २०२४ मध्ये सहभागी व्हावे यासाठी पानी फाउंडेशन टिम सोबत आपण संपर्क करावा असे त्यांनी सांगितले.

डॉ. सचिन पावडे यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट शेती करणे करणे ही आता गरजेचे आहेत व शहरी लोकांनी सुद्धा शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष जोडल्या जाण्याची गरज असल्याचे व्यक्त केले व उपस्तीत सर्व सर्व शेतकऱ्यांना पुढील वाटचाळीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी पानी फाउंडेशन चे विभागीय समन्वयक यांनी प्रशिक्षणानंतर सर्व पानी फाउंडेशन ची नेहमी आपल्या सोबत असणार असल्याचे सांगितले सर्व प्रशिक्षणार्थी यांना शुभेच्छा देऊन प्रशिक्षण देणाऱ्या सर्व प्रशिक्षण टीमचे देखील अभिनंदन केले. यावेळी  पानी फाउंडेशन तालुका समन्वयक राम अंभूरे, शिवाहरी टेके तसेच सर्व प्रशिक्षक टिम उपस्थित होती.





  Print






News - Wardha




Related Photos