काँग्रेसचे माजी मंत्री संजय देवतळे यांनी बांधले शिवबंधन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
काँग्रेसच्या तिकिटावर   चार वेळा आमदार आणि मंत्री राहिलेले  संजय देवतळे यांनी आज बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईमध्ये मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. सोबतच  त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
संजय देवतळे हे  २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने तिकीट नाकारल्यने ऐनवेळेस त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर विधानसभा लढली. २०१९  ला शिवसेना - भाजप युती झाल्याने वरोरा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला  गेले.   त्यामुळे देवतळे यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधले.  वरोरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसकडून विद्यमान खासदार बाळू धानोरकर यांच्या सौभाग्यवती प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-10-02


Related Photos