मंगळवारी राज्यात विविध मतदारसंघांमध्ये ३१३ उमेदवारांनी केले अर्ज दाखल


वृत्तसंस्था / मुंबई :  विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी राज्यात विविध मतदारसंघांमध्ये 251 उमेदवारांनी 313 अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत एकूण 366 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत 4 ऑक्टोबरपर्यंत आहे. याबाबतची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.
नंदुरबार जिल्ह्यात एका मतदारसंघात एका उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले. धुळे जिल्ह्यात एका मतदारसंघात दोन उमेदवारांनी, जळगाव जिल्ह्यात 4 मतदारसंघात 5 उमेदवारांनी, बुलढाणा जिल्ह्यात 3 मतदारसंघात 3 उमेदवारांनी, अकोला जिल्ह्यात 4 मतदारसंघात 7 उमेदवारांनी, वाशिम जिल्ह्यात एका मतदारसंघात एका उमेदवाराने, अमरावती जिल्ह्यात 4 मतदारसंघात 7 उमेदवारांनी, नागपूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 8 उमेदवारांनी, भंडारा जिल्ह्यात 2 मतदारसंघात 3 उमेदवारांनी, गोंदीया जिल्ह्यात 2 मतदारसंघात 5 उमेदवारांनी, गडचिरोली जिल्ह्यात 2 मतदारसंघात 2 उमेदवारांनी, चंद्रपूर जिल्ह्यात 3 मतदारसंघात 5 उमेदवारांनी, यवतमाळ जिल्ह्यात 4 मतदारसंघात 6 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
नांदेड जिल्ह्यात 6 मतदारसंघात 11 उमेदवारांनी, हिंगोली जिल्ह्यात एका मतदारसंघात 2 उमेदवारांनी, परभणी जिल्ह्यात 4 मतदारसंघात 6 उमेदवारांनी, जालना जिल्ह्यात 4 मतदारसंघात 9 उमेदवारांनी, संभाजीनगर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 6 उमेदवारांनी, नाशिक जिल्ह्यात 5 मतदारसंघात 8 उमेदवारांनी, पालघर जिल्ह्यात 3 मतदारसंघात 6 उमेदवारांनी, ठाणे जिल्ह्यात 11 मतदारसंघात 16 उमेदवारांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 11 उमेदवारांनी, मुंबई शहर जिल्ह्यात 4 मतदारसंघात 6 उमेदवारांनी नामनिर्देशपत्रे दाखल केली आहेत.
रायगड जिल्ह्यात 4 मतदारसंघात 7 उमेदवारांनी, पुणे जिल्ह्यात 12 मतदारसंघात 25 उमेदवारांनी, नगर जिल्ह्यात 5 मतदारसंघात 7 उमेदवारांनी, बीड जिल्ह्यात 6 मतदारसंघात 10 उमेदवारांनी, लातूर जिल्ह्यात 4 मतदारसंघात 9 उमेदवारांनी, धाराशीव जिल्ह्यात 2 मतदारसंघात 3 उमेदवारांनी, सोलापूर जिल्ह्यात 8 मतदारसंघात 21 उमेदवारांनी, सातारा जिल्ह्यात 3 मतदारसंघात 5 उमेदवारांनी, रत्नागिरी जिल्ह्यात एका मतदारसंघात एका उमेदवाराने, सिंधुदूर्ग जिल्ह्यात एका मतदारसंघात 2 उमेदवारांनी, कोल्हापूर जिल्ह्यात 9 मतदारसंघात 17 उमेदवारांनी, सांगली जिल्ह्यात 6 मतदारसंघात 8 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.  Print


News - Rajy | Posted : 2019-10-02


Related Photos