महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय लोक अदालतीत तडजोडीत ३३७  प्रकरणांचा निपटारा : ८ लाख ८९ हजार दंड वसूल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : दिवाणी व फौजदारी न्यायालय बल्लारपूर येथे ३ मार्च रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये बल्लारपूर तालुक्यातील न्यायालयीन वादपूर्व प्रकरणे असे एकूण २ हजार ८६ प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली. त्यापैकी ३३७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून त्यांच्याकडून ८ लाख ८९ हजार ९१८ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

राष्ट्रीय लोक अदालत मध्ये वाहतूकीच्या ५४६ प्रकरण ठेवले होते त्यात १०८ प्रकरण निकाली काढण्यात आले. त्यात ३ लाख  ७६ हजार १०० रुपये वसुली करण्यात आले. तसेच नियमित ५ प्रकरणात ७५ हजार रुपये वसुली करण्यात आले. १३४१ वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आले त्यात २२४ प्रकरण निकाली काढण्यात आले. त्यात ४ लाख २३ हजार ३१८ रुपये वसुली करण्यात आले. तर कौटंबिक कलह चे एक प्रकरण निकाली काढून पती पत्नी एकीकरण झाले.

लोक अदालतीमध्ये पॅनल प्रमुख दिवाणी व फौजदारी न्यायाधीश ए. एस. शर्मा होते. तर पॅनल अधिवक्ता म्हणून ॲड. मिलिंद भसारकर यांनी काम पाहिले.

यावेळी ॲड.आय.आर. सय्यद, ॲड. संजय बोराडे, ॲड.अरविंद तितरे, ॲड. संदेश हस्ते, ॲड. गेडाम, ॲड. लिंगे, ॲड. प्रणय काकडे, ॲड. विधाते, ॲड. पुरी व इतर वकील उपस्थित होते. राष्ट्रीय लोक अदालत मध्ये न्यायालयातील कर्मचारी ए.ए. बोडखे सहायक अधीक्षक, पाठक स्टेनोग्रफर, लिपिक एम.पी. बागडे, पी.टी. पेटकर, वरिष्ठ लिपिक प्रवीण खोब्रागडे यांनी सहकार्य केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos