आज अहेरी विधानसभा क्षेत्रातून अपक्ष दीपक आत्राम यांनी भरला अर्ज, गडचिरोली विधानसभा क्षेत्रातही एक नामांकन दाखल


- तिनही विधानसभा क्षेत्रात १७ अर्जांची विक्री
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
आज १ ऑक्टोबर रोजी अहेरी आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी एक नामांकन दाखल झाला आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातून अपक्ष दीपक आत्राम यांनी नामनिर्देशपत्र दाखल केले आहे. तर गडचिरोली विधानसभा क्षेत्रातही एका उमेदवाराने नामनिर्देशन केले आहे.
आज नामनिर्देशन करण्याच्या तिसर्या दिवशी तिनही विधानसभा क्षेत्रात एकूण १७ नामांकनाची विक्री झाली आहे. यामध्ये आरमोरी ४, गडचिरोली ७ आणि अहेरी ६ नामांकनांचा समावेश आहे. 
याआधी आरमोरी विधानसभा क्षेत्रातून बसपाचे बालकृष्ण सडमाके यांनी आणि अहेरी विधानसभा क्षेत्रातून अजय आत्राम यांनी पहिल्याच दिवशी नामांकन केले आहे. तर गडचिरोली विधानसभा क्षेत्रात एका उमेदवाराने आज नामांकनाचे खाते उघडले आहे. 

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-01


Related Photos