निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केलेल्या ८ जणांना भाजपच्या पहिल्या यादीत समावेश


वृत्तसंस्था / मुंबई :  आज भाजपने १२५ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली.या यादीत  बहुतांश प्रस्थापितांना  पुन्हा संधी दिली आहे.  तसेच  निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केलेल्या ८ जणांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे.
काँग्रेसमधून भाजपत गेलेले राधाकृष्ण विखे, हर्षवर्धन पाटील, जयकुमार गोरे, कालिदास कोळंबकर यांना भाजपने तिकीट दिलं आहे. तर राष्ट्रवादीतून भाजपत आलेल्या  राणा जगजितसिंह, शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, संदिप नाईक यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे भाजपच्या पहिल्या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  आणि  विनोद तावडे यांचं देखील या यादीत नाव नाही. दरम्यान, पक्षातल्या अनेक नेत्यांना किंबहुना विद्यमान आमदारांना भाजपने डच्चू दिला आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-10-01


Related Photos