महत्वाच्या बातम्या

 यूट्यूबची मोठी घोषणा : आता शॉट्स व्हिडिओ मधूनही करता येणार कमाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : छोटे व्हिडिओ म्हणजे शॉट्स किंवा रिल्स यांचा ट्रेंड सध्या मोठ्या प्रमाणावक वाढताना दिसतोय. युझर्स इतर कोणत्याही सोशल मीडिया वेबसाइट किंवा व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपेक्षा शॉट्स व्हिडिओवर अधिक वेळ घालवत असल्याचीही नोंद करण्यात आली. यामुळेच यूट्यूबने आपल्या प्लॅटफॉर्मवर शॉर्ट व्हिडीओ अर्थात यूट्यूब शॉर्ट्सचे फीचर आणले आहे.

हे शॉर्ट व्हिडीओ जगभर खूप लोकप्रिय झाले असून कंपनी यातून कमाई करण्याचा विचार करतेय. केवळ कंपनीच नाही तर युझर्सना यूट्यूब शॉट्स मधून पैसे कमवण्याची संधीही देतेय.

मंगळवारी, कंपनीने यूट्यूब शॉट्स वर एक नवीन फीचर ॲड केले आहे. काही युझर्स अमेरिकेत या फिचरची चाचणी घेत होते. याच्या मदतीने युझर्स व्हिडिओमध्ये प्रोडक्टना टॅग देखील करू शकणार आहेत.

गुगलच्या प्रवक्ते यांनी याबाबत माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, यूएस, भारत, ब्राझील, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामधील दर्शकांना टॅग्स पर्याय दिसेल. आम्ही हळूहळू इतर निर्मात्यांना टॅगिंगचे फिचर्स आणण्यास सुरुवात करणार आहे. यूट्यूबच्या या फीचरची चर्चा यापूर्वीच झाली.

यूट्यूबने त्याच्या प्लॅटफॉर्मवर निर्मात्यांसाठी उत्पन्न होण्याचा एक स्त्रोत जोडला. कंपनीने शॉर्ट व्हिडिओंवर जाहिरातींचे फीचर देखील जोडले. ज्यामध्ये व्हिडिओ निर्मात्यांना 45 टक्के मिळणार आहे. त्यामुळे आता जवळपास सर्वच व्हिडिओ प्लॅटफॉर्म्सना टिकटॉककडून मोठे आव्हान मिळत आहे.





  Print






News - World




Related Photos