महत्वाच्या बातम्या

 ट्रकने चिरडले दुचाकीस्वारास : एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी


- सोनापूर क्रांसिंग जवळ झाला अपघात 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : एका ट्रकने दुचाकीला जब्बर धडक दिल्याने एका ईसमाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाल्याची घटना सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास चामोर्शी जवळील सोनापूर फाट्यावर घडली.

चामोर्शी तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटर अंतरावरील सोनापूर क्रासिंग जवळ ४ मार्च रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास अपघात झाला असून, सुरेश महादेव दुधबावरे, रा - सोनापूर हे आपल्या काही कामा निमित्य MH३३ Z ६८७७ या दुचाकीने चामोर्शीला गेले होते. वापस येतांना सोनापूर क्रासिंग जवळ जिंदाल स्टील कंपनीच्या ट्रक CG ०७, BG५५९७ ने बाईकला जब्बर  धडक दिली हा अपघात एवढा भयानक होता की, इथे सुरेश दुधबावरे यांच्या जागीच मृत्यू झाला. तर लुकेश रामभाऊ दुधबावरे हे जखमी आहेत घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे पाठविण्यात आला. पुढील तपास चामोर्शी पोलिस करीत आहेत. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos