व्हायरल झालेला वाघाचा ‘तो’ फोटो मुडझा - वाकडी परिसरातील नाही


- विदर्भ न्यूज एक्सप्रेेसने घेतलेल्या माहितीत सत्य उघड
- ‘तो’ फोटो २०१८ पासून वेगवेगळ्या ठिकाणाहून होत आहे व्हायरल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा मुख्यालयापासून ५ ते ६ किमी अंतरावर असलेल्या मुडझा - वाकडी परिसरात सध्या वाघाचा वावर सुरू आहे. मात्र काही दिवसांपासून हा वाघ मुडझा मार्गावर दिसून आल्याबाबतचा एक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत असून या फोटोच्या आधारे काही वृत्तपत्रांनी वृत्त सुध्दा प्रकाशित केले आहे. मात्र विदर्भ न्यूज एक्सप्रेसने या फोटोची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता खरी माहिती समोर आली असून ‘तो’ व्हायरल फोटोतील वाघ मुडझा - वाकडी परिसरातील नसल्याचे उघडल झाले आहे. 
वाकडी - मुडझा परिसरात काही दिवसांपासून वाघाचा संचार सुरू आहे. यामुळे वनविभाग या वाघाच्या संचारावर लक्ष ठेवून आहे. या वाघाने या परिसरात काही जनावरेसुध्दा ठार केली आहे. यामुळे काही प्रमाणात नागरीकांमध्ये दहशत आहे. काही दिवसांपासून हा वाघ मुख्य मार्गावर फिरत असल्याची अफवा पसरविण्यात येत आहे. सोबतच एक वाघाचा फोटोसुध्दा सोशल मिडीयावर फिरत आहे. मात्र हा फोटो खुप जूना असून वेगवेगळ्या ठिकाणावरून व्हायरल झाला आहे. तसेच या फोटोत काही वाहनांचे हेडलाईट दिसत आहेत. तसेच वर पथदिवेसुध्दा स्पष्टपणे दिसून येत आहेत. तसेच आता पावसाचे दिवस असतानाही जवळील भागात साधे गवतही दिसून येत नाही. यामुळे हा फोटो खुप जुना असल्याची शक्यता आहे. हा फोटो वेगवेगळ्या व्हाट्सॲप गृपवरून वेगवेगळ्या ठिकाणच्या माहितीसह व्हायरल करण्यात आला आहे. 
पाकीस्तान, पश्चिम बंगाल, कोलकत्ता, मुंबई , कर्नाटक अशा विविध ठिकाणच्या अनेक बातम्यांमध्ये सुध्दा हाच फोटो वापरण्यात आला आहे. यामुळे फोटोत दिसणारा वाघ मुडझा - वाकडी परिसरातील नाही, हे स्पष्ट झाले आहे. फोटो आणखी खोट्या माहितीसह व्हायरल करू नये, आवाहन वन्यजीवप्रेमींनी केले आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-30


Related Photos