पोलिस अधीक्षकांनी केला सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी/ गडचिरोली :
जिल्हा पोलिस दलातून सेवानिवृत्त झालेल्या ९ पोलिस अधिकारी, कर्मचारी व एक ज्येष्ठ लिपीक, एक महिला शिपाई यांचा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याहस्ते आज ३० सप्टेंबर रोजी सत्कार करण्यात आला.
सेवानिवृत्तांमध्ये पोलिस निरीक्षक सिध्दानंद मांडवरकर, सहाय्यक फौजदार नरेंद्र चर्जन, सहाय्यक फौजदार अंताराम पुडो, भगवान कन्नाके, खेमराज लेनगुरे, मोरेश्वर मदनकर, दिलीप चट्टे, वासुदेव मंडलवार, आनंदराव सहारे, वरीष्ठ लिपीक हुसेन शेख, महिला शिपाई लता काळे यांचा समावेश आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. पोलिस अधिक्षकांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहकुटुंब शाल, श्रीफळ, रोपटे, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सत्कार केला. पोलिस अधिकारी, कर्मचार्यांनी पोलिस खात्यातील अनुभवाचे कथन केले. पोलिस अधीक्षक बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामगिरीची प्रशंसा केली.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-30


Related Photos