दारू तस्करीत सहभागी पोलीस शिपायासह पाच जणांना मूल पोलिसांनी केली अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
पोलिस मुख्यालयात तैनात पोलिस शिपायासह पाच जणांना    दारूची तस्करी करताना मूल पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मद्यसाठा व दोन कार जप्त करण्यात आल्या. परवेज इशाद बाळापुरे ( ३२) रा.धरमपेठ असे पोलीस शिपायाचे नाव आहे. त्याच्यासह भूषण अशोक डुंभरे ( २६)  देशपांडे लेआऊट , प्रकाश प्रमोद रंगारी (२४), विजय बाबूराव तायवाडे (२९) व हर्षल विनोद मोटघरे (२८)  या आरोपींना अटक करण्यात आली आहे. परवेज इशाद बाळापुरे हा  पोलीस  मुख्यालयात तैनात आहे. 
नागपुरातील काही जण मूलमार्गे चंद्रपूर येथे दारू घेऊन जात असल्याची माहिती मूल पोलिस स्टेशनचे ठाणेदार सतीशसिंग राजपूत यांना मिळाली. शुक्रवारी रात्री राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज गदादे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चामोर्शी नाक्याजवळ सापळा रचला. एम.एच. ४०- एटी- ८१७१ व एम.एच.४०-एटी-८१९९ या क्रमांकाच्या कारला पोलिसांना थांबविले. दोन्ही कारची झडती घेतली असता त्यामध्ये साडे तीन लाखांची विदेशी दारू आढळली. दारू तस्करीत पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयात देण्यात आली . अधीक्षक कार्यालय नागपूर पोलिसांना या घटनेचा अहवाल पाठविणार आहे. अटकेतील तस्करांची सोमवारपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. ही दारू कोणाला पोहोचविण्यात येणार होती, याचा शोधही मूल पोलिस घेत आहेत.
  Print


News - Chandrapur | Posted : 2019-09-30


Related Photos