महत्वाच्या बातम्या

 राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट : हवामान खात्याचा विदर्भ व मराठवाड्यात पावसाचा अंदाज


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुबई : राज्यात काही ठिकाणी उकाडा वाढत असताना काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता पुन्हा हवामान खात्याने पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील ४८ तासांत राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.

राज्यासह देशात काही भागात वीकेंडला पावसाने धुमाकूळ घातला आहे. शनिवारी अनेक भागात पाऊस झाला असून रविवारीही पावसाचा अंदाज कायम आहे. राज्यासह देशात पुढील ४८ तासांत काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यासह देशात विविध ठिकाणी आगामी दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. यासोबतच काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबई, नवी मुंबई, पालघरसह ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. मुंबईत अंशतः ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईत काही भागात पावसाची शक्यता आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील तीन दिवसांचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

राज्यासह देशात जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस किंवा हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय, हवामान खात्याने दिल्ली, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेशसह इतर प्रदेशांसह अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. हिमालयीन प्रदेशात जोरदार पाऊस आणि बर्फवृष्टी आणि वायव्य भारताच्या मैदानी भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मध्य प्रदेश, हरियाणा, चंदीगड, जम्मू-काश्मीर, लडाख, पउत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान या भागात गारपिटीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.





  Print






News - Rajy




Related Photos