अखेर कृषी विभागाचे अधिकारी चोप गावात दाखल , शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन


- विदर्भ न्यूज एक्सप्रेस च्या वृत्ताची घेतली दखल 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
तालुक्यातील चोप परिसरात धान (भात) पिकावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे. याची दखल घेऊन कृषी विभागाने  उपाययोजनांची शिफारस करावी, या आशयाचे वृत्त विदर्भ न्यूज एक्स्प्रेस मध्ये प्रकाशित होताच   बातमीची दखल घेऊन तालुका कृषी विभागाने गावात येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 
धान पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यामुळे  जिल्हा कृषी अधीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तालुका कृषी विभागाचे अधिकारी चोप गावात दाखल झाले.  लष्करी अळी, मावा, तुडतुडे  व करपा रोगाबद्दल   विस्तृत मार्गदर्शन केले . यावेळी मंडळ कृषी अधिकारी युगेश रनदिवे  , तालुका तत्रंज्ञ व्यवस्थापन महेंद्र दोनाडकर , कृषी पर्यवेक्षक यशवंत कुंभरे,   कृषी सहायक कोहाडकर  उपस्थित होते . ग्रामपंचायतच्या  सभागृहात   झालेल्या कार्यक्रमात बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते .    Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-28


Related Photos