महत्वाच्या बातम्या

 चुकीच्या व्यक्तीला यूपीआय द्वारे पैसे गेल्यास काय करावे?


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : गेल्या काही वर्षात हिंदुस्थानात यूपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे. शहरांपासून ते अगदी खेड्यापर्यंत सर्व ठिकाणी यूपीआयद्वारे व्यवहार केले जातात. रोख रक्कम बाळगण्यापेक्षा या सोप्या पध्दतीने व्यवहार करणे लोकांच्या सोयीचे झाले आहेत.

मोबाईलवरून पैशांची देवाण घेवाण करण्याचा हा मार्ग जलद व सोपा आहे. मात्र अनेकदा अवधानाने किंवा आपल्या कडून झालेल्या चुकीमुळे पैसे भलत्याच व्यक्तीच्या खात्यात जाण्याची शक्यता असते. तर तुमच्या सोबतही असा प्रकार घडला असेल आणि आपले पैसे परत मिळतील की नाही अशी शंका असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

चुकून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात गेलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. यूपीआयद्वारे एखादा चूकीचा व्यवहार झाल्यास, त्यासाठी गुगल पे, फोन पे, आणि पेटीएम सारखी थर्ड पार्टी ॲप्स जबाबदार नसतात. यासाठी तुमचे यूपीआय खाते ज्या बँकेशी निगडीत असते त्या बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधावा. कस्टमर केअरने बँकेला ईमेल करण्यास सांगितल्यास, तुम्हाला तक्रारीच्या ईमेल द्वारे पैसे मिळू शकतात. मात्र या मार्गाने पैसे न मिळाल्यास तुम्ही ईमेल ची प्रिंट घेवून स्वतः बँकेत जावून घडल्या प्रकाराबद्दल संबंधित अधिकाऱ्याला कळवू शकता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या आदेशानुसार चुकीच्या खात्यात पैसे जमा झाल्याची तक्रार मिळाल्याच्या 7 ते 15 दिवसांच्या आत बँकेला तक्रारदाराचे पैसे त्याच्या खात्यात जमा करणे गरजेचे आहे. यामुळे जर तुमच्याकडून यूपीआय द्वारे चुकून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा झाले असतील तर तत्काळ तुमच्या बँकेशी संपर्क साधा.





  Print






News - Rajy




Related Photos