महत्वाच्या बातम्या

 अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती


- २८ मार्च ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अतिंम मुदत  

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : शैक्षणिक सत्र २०२३- २४ करीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरीता शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ मार्च २०२४ पर्यंत असणार आहे.

चिमूर, प्रकल्प कार्यालयातंर्गत येत असलेल्या महाविद्यालयामध्ये चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड, वरोरा व भद्रावती या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयांनी आदिवासी विकास विभागामार्फत सुरू असलेल्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना त्यांचे आधार कार्ड अपडेट असावे. आधार बँक किंवा पोस्ट यांच्याशी लिंक असावेत. शासकीय वसतीगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांनी वसतीगृह विद्यार्थी अशी नोंद शिष्यवृत्तीच्या आवेदन पत्रात करावी. अर्ज भरताना काही अडचण उद्भवल्यास चिमूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ मार्च ०२४ पर्यंत देण्यात आली असून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची कार्यवाही करावी. तसेच महाविद्यालयांनी महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले शिष्यवृत्ती अर्ज त्वरित निकाली काढण्याची कार्यवाही करावी, असे चिमूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी प्रवीण लाटकर यांनी कळविले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos