गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या दिवशी २ नामनिर्देशन अर्ज दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
गडचिरोली विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने आज तीन विधानसभा क्षेत्र गडचिरोली, आरमोरी आणि अहेरी या मतदार संघासाठी आज एकूण ५४ अर्ज विक्री झाले त्यापैंकी सर्वांत जास्त अर्ज विक्री ही आरमोरी मतदार संघात झाली असून २७ अर्ज विक्री करण्यात आले. त्यानंतर गडचिरोली क्षेत्रातून  २२ अर्ज विक्री तर अहेरी विधानसभा क्षेत्रातून ५ अर्ज विक्री करण्यात आले. त्यापैंकी  दोन वेगवेगळया मतदार संघात २ नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले. त्यात १ अर्ज आरमोरी विधानसभा क्षेत्रातून बहुजन समाज पार्टी चे बालकृष्ण श्रीराम सडमाके  यांनी दाखल केले तर अहेरी विधानसभा क्षेत्रातून अजय मलय्या आत्राम  यांनी आज नामनिर्देशन दाखल केले. तर गडचिरोली आत्राम अद्याप एकही नामनिर्देशन आत्राम दाखल झाले नाही.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-27


Related Photos