भंडारा जिल्ह्यात पहिल्याच दिवशी ४८ उमेदवारांकरीता ११६ नामनिर्देशनपत्राची उचल


-  विधानसभा निवडणूकीच्या नामनिर्देशनाला सुरुवात
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
विधानसभा निवडणूकीची अधिसूचना आज २७ सप्टेंबरला प्रसिध्द करण्यात आली असून  आज शुक्रवारपासून नामनिर्देशन पत्र वितरित करुन दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे.  आज पहिल्या दिवशी तुमसर, भंडारा, साकोली, विधानसभा क्षेत्रात ४८ उमेदवारांकरीता ११६ नामनिर्देशनपत्राची उचल करण्यात आले आहे. यामध्ये तुमसर १२ उमेदवार ४२ नामनिर्देशनपत्र, भंडारा २६ उमेदवार ६० नामनिर्देशनपत्र तर साकोली १०  उमेदवार १४ नामनिर्देशनपत्र यांचा समावेश आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची अधिसूचना आज शुक्रवारी प्रसिध्द झाली असून नामनिर्देश्नपत्र वाटप व दाखल करण्याच्या प्रक्रियेला तीनही विधानसभा क्षेत्रामध्ये सुरुवात झाली आहे. ६० - तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये १२  उमेदवारांना ४२ नामनिर्देशनपत्र उचल करण्यात आली आहे. प्रत्येकी १०  उमेदवारांनी ४ याप्रमाणे ४० नामनिर्देशनपत्र घेतली आहे तर २ उमेदवारांनी प्रत्येकी १ नामनिर्देशन पत्र स्विकारुन तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये विधानसभेकरीता उमेदवार म्हणून तयारी दर्शविली आहे.
भंडारा विधानसभा क्षेत्रामध्ये २६ उमेदवारांकरीता ६० नामनिर्देशनपत्र स्विकारलेली आहे. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी, विदर्भ राज्य आघाडी, शेतकरी संघटना, भारतीय कॅम्युनिष्ठ पार्टी, बहुजन समाज पार्टी, पिपल्स रिपब्लीकन पार्टी व अपक्ष यांचा समावेश आहे.
साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये १० उमेदवारांकरीता १४ नामनिर्देशनपत्राची उचल करण्यात आली. प्रत्येकी तीन अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी दोन या प्रमाणे तर उर्वरित ८ उमेदवारांनी प्रत्येकी १ या प्रमाणे  असे एकूण १४ नामनिर्देशपत्र उचल करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टी , वंचित बहुजन आघाडी व अपक्षांचा समावेश आहे.तीनही विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण ४८ उमेदवारांकरीता ११६ नामनिदे्रशन पत्र उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी भंडारा, तुमसर व साकोली यांच्या सतरावरुन दुपारी ३ वाजेपर्यंत वितरित करण्यात आलेली आहे. पहिल्या दिवशी ११६ नामनिर्देशनपत्र वितरित करण्यात आली तर एकही उमेदवारांचा नामनिर्देशनपत्र  दाखल झालेला नाही. २७ सप्टेंबर पासून तर ४  ऑक्टोंबर पर्यंत नामनिर्देशनपत्र स्विकारणे व दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.

   Print


News - Bhandara | Posted : 2019-09-27


Related Photos