इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरण्यास मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
इन्कम टॅक्स रिटर्न फाईल (lTR File ) भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी आयटी फाईल केली नसेल त्यांना संधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरण्यास  मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने याबाबात माहिती दिली. याबाबत सीबीडीटीने ट्विट केले आहे.
इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली असून आता ३१ ऑक्टोबरपर्यंत आता इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरता येणार आहे. तसेच केवळ इन्कम टॅक्स रिटर्न फाईलच नाही तर टॅक्स ऑडिट रिपोर्ट जमा करण्यासाठीही मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी टॅक्स ऑडिट रिपोर्ट जमा करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर होती. तीदेखील वाढवून ३१ ऑक्टोबर करण्यात आली आहे. 
  Print


News - Rajy | Posted : 2019-09-27


Related Photos