चोप परिसरात धान पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव, कृषी विभागाने मार्गदर्शन करावे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : 
तालुक्‍यातील चोप परिसरात धान (भात) पिकावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे. त्याची दखल घेऊन कृषी विभाग ने उपाययोजनांची शिफारस करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 
लांबलेला पाऊस आणि कीडरोगाचा प्रादुर्भाव यामुळे भात पिकासमोर संकट उभे राहिले आहे, त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. चोप येथे ५० हेक्टर क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला असून  परिणामी शेतकरी संकटात सापडून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. 
लष्करी अळीची एक पिढी पूर्ण होण्यास ३० ते ४० दिवस लागतात. या अळ्या लष्काराप्रमाणे पिकावर हल्ला चढवतात. या अळ्या दिवसाला शांत राहत रात्रीला जोरदार आक्रमण करतात. पाने कुरडतात. यात धानपिकाचे मोठे नुकसान होणार आहे.  या अळीच्या  व्यवस्थापनाकरिता शेतांचे बांध स्वच्छ ठेवावे.  किडीचे पतंग आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे व कामगंध सापळ्यांचा वापर करावा अळीच्या नियंत्रणाकरिता क्लोरोपायरीफास ,सायफरमेथ्रिन २० एमएल ,व प्रोफेक्स १५ एमएल १० लीटर पाण्यात मिसळून सकाळी किंवा सायंकाळी फवारणी करावी, असे आवाहन कृषी परिवेक्षक कुमरे यांनी केले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-27


Related Photos