कोपर्शी जंगलात पोलिस - नक्षल चकमक, शस्त्रासह नक्षली साहित्य जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या कोपर्शी जंगल परिसरात काल २४ सप्टेंबर रोजी पोलिस - नक्षल चकमक उडाली. या चकमकीनंतर पोलिसांनी शस्त्रसाठ्यासह नक्षली साहित्य जप्त केले आहे.
कोपर्शी जंगल परिसरात सी - ६० जवान शोधमोहिम राबवित असताना ही चकमक उडाली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षली जंगलात पसार झाले. चकमकीनंतर शोधमोहिमेत मोठ्या प्रमाणात साहित्य आढळून आले आहे. या परिसरात नक्षलविरोधी अभियान तिव्र करण्यात आले आहे.

 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-09-25






Related Photos