महत्वाच्या बातम्या

 आधारभुत दराने मुंग, उडिद व सोयाबिन खरेदीकरीता नोंदणी सुरु


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : नाफेडच्यावतीने पणन संघामार्फत आधारभूत दराने मुंग, उडिद व सोयाबिन खरेदी करण्याकरीता नोंदणी व खरेदी सुरु करण्यात आली आहे.  ७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आधारभूत दराने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी विक्री केंद्रात जाऊन मालाची नोंदणी करुन दिलेल्या वेळेत माल विक्रीस आणावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी केले आहे.

मुंग ७ हजार ७५५ रुपये, उडिद ६ हजार ६०० व सोयाबिन ४ हजार ३०० रुपये या आधारभूत दराने खरेदी विक्री केंद्रावर मालाची खरेदी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वर्धा, देवळी, पुलगाव, कारंजा, आष्टी, आर्वी, सिंदी व सेलू येथील तालुका सहकारी खरेदी विक्री समिती केंद्रावर तसेच हिंगणघाट व समुद्रपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकऱ्यांनी आपला माल खरेदीस आणावा, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी कळविले आहे. 





  Print






News - Wardha




Related Photos