शिर्डीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलींग व नाकाबंदी दरम्यान लाखोंची रोकड पकडली


- आचारसंहिता काळातील महाराष्ट्रातील पहिली कारवाई 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी  / शिर्डी  :
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून विविध पथके तैनात करून नाकाबंदी करण्यात येत आहे. वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान स्थानिक  पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नाकाबंदीदरम्यान लाखोंची रोकड जप्त करण्यात आली असून ही महाराष्ट्रातील पहिलीच कारवाई असल्याचे बोलल्या जात आहे. 
विधानसभा निवडणुक- २०१९ च्या  अनुषंगाने अहमदनगर  पोलीस अधिक्षक यांच्या आदेशानुसार   जिल्ह्यात सर्वत्र अवैध वाहतुक, अग्निशत्रे विरोधक ,तसेच बेहिशोबी रक्कम व मौल्यवान  वस्तु घेउन जाणाऱ्यावर कारवाई करीता प्रत्येक पोलीस स्टेशनला पेट्रोलींग तसेच नाकाबंदी लावण्याचे निर्देश दिले आहेत. शिर्डी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक गंधाले यांच्या मार्गदर्शनात आदेशान्वये पोलीस नाईक जी ई सोनवणे, कुल्हे,पोकाँ पंडोरे हे शासकिय वाहनाने  पेट्रोलींग करीत असतांना शिर्डी शहरात आरबीएल चौकात लावलेल्या नाकाबंदी जवळ  एक महींद्रा कंननिची जितो वाहन क्रमांक  एम एच १७ बीडी २३९० अशी राहाता कडुन येतांना दिसली. वाहन थांबुन नाकाबंदी कर्मचारी पोना पी डी अंधारे व पोकाँ व्ही पी मैंद व इतर ४  होमगार्ड  यांनी तिची तपासणी केली असता त्यावर चालक किरण प्रभाकर डाडर (२६) रा डिग्रस ता राहुरी व त्याच्या  सोबत मनोज मोतीलाल बाफना (३५)  रा.मेनरोड राहुरी
हे दोघे आढळून आले.  त्यांच्याकडे  १०० रु दराच्या १६०० नोटा, ५००  रु दराच्या २०० नोटा, २० रु दराच्या २०० नोटा व १० रु दराच्या ६०० नोटा आढळून आल्या.  एकुण २ लाख   सत्तर हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.  सदर रक्कमेबाबत   चौकशी केली असता  समाधानकारक उत्तर व रकमेसंदर्भात विवरण मिळाले नाही. सदर  रक्कम  जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये आगामी  विधानसभा निवडणुक- २०१९ चे अनुषंगाने तयार करणेत आलेल्या फ्लाईग स्काँड व स्टॅटीक  टिमच्या ताब्यात देउन ती रक्कम  तहसिलदार  राहाता  यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. 
 सदर कारवाई पोलीस अधिक्षक ईशु सिंधु  , अप्पर पोलीस अधिक्षक यांचे निर्देशानुसार डॉ.दिपाली काळे श्रीरामपुर विभाग, यांच्या सुचनेनुसार तसेच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या  मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस स्टेशनचे सपोनि दिपक गंधाले, पोसई जाने ,पोना जी ई  नवणे, पोना कुल्हे,पोना अंधारे पी डी, पोकाँ मैंद ,पोकाँ पंडोरे तसेच ४  होमगार्ड यांनी  केली आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-09-25


Related Photos