मेयोतील टेक्निशियन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर 
: इंदिरा गांधी रूग्णालय नागपूर येथे वाहन चालकाची जागा निघाल्या असून  चालकाची  नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ८ लाखांची लाच मागून  टोकन म्हणून २० हजार रूपये स्वीकारताना रूग्णायातील टेक्निशियन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
  जावेद पठाण हमीद पठाण  (३१) असे लाचखोर टेक्निशियन चे नाव आहे. त्याला २० हजारांची लाच स्विकारतांना ॲन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडले आहे  यातील तक्रारदार हे एकमिनार मस्जिद ताजबाग नागपूर येथील रहीवासी असुन ऑटो  चालविण्याचे काम करतो. दोन महिण्यापुर्वी तक्रारदाराची ओळख टेक्निशियन  जावेद पठाण हमीद पठाण याच्यासोबत झाली. जावेद पठाण हमीद पठाण याने तक्रारदारास   १९ सप्टेंबर रोजी फोन करून  इंदिरा गांधी रूग्णालय नागपूर येथे चालक या पदाकरिता जागा निघाल्या आहेत. माझी सहारे बाबु व रूग्णालयाचे डिन डाॅ.   अजय केवलिया  यांच्यासोबत चांगली ओळख असुन त्या दोघांचे सर्व पैशांचे लेन-देनचे पुर्ण काम मीच करतो असे सांगुन तक्रारदारास चालक या पदाकरिता नोकरी लावण्याकरिता  ८ लाख रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराची लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथील अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर चे पोलीस निरीक्षक   दिनेश लबडे यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून टेक्निशियन जावेद पठाण हमीद पठाण  याच्या विरूध्द योजनाबध्दरित्या काल २४ सप्टेंबर  रोजी  सापळा  रचून  लाच रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने रंगेहात पकडले. 
 त्याच्या विरूध्द पोलीस ठाणे सक्करदरा नागपूर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक   रश्मी नांदेडकर  व अपर पोलीस अधीक्षक  राजेश  दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, पोहवा प्रविण पडोळे, नापोशि प्रभाकर बले, मंगेश कळंबे, मनापोशि शालीनी जांभुळकर, चालक पोहवा चौधरी यांनी केली आहे.

 
  Print


News - Nagpur | Posted : 2019-09-25


Related Photos