आष्टी पोलिसांची रेश्मीपुर येथील कोंबडा बाजारावर धाड़, ७ जणांना अटक


-  दोन लाखांचा ऐवज  जप्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आष्टी :
  चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रेश्मीपुर जंगल परिसरात काही लोक कोंबड्यांची झुंज लाऊन जुगार खेळत असल्याच्या मिळालेल्या गुप्त माहितीवरून  आष्टी पोलिसांनी सापळा रचुन काल  २२ रोजी  दुपारी ४.३०  वाजता धाड़  टाकली.  या  धाडीत ७ आरोपींना अटक करण्यात आली असून लाखोंचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 
 अजय शिबू सरदार रा दुर्गापुर ता.चामोर्शी , प्रशांत वासुदेव पिपरे रा हेटी ता.चामोर्शी ,  गुलाब गंगाराम गेडाम रा राजगोपालपुर ता.चामोर्शी ,  विलास दादाजी कष्टी रा राजगोपालपुर ता.चामोर्शी,  नरेंद्र सुभास सोनटक्के रा पिपरी देशपांडे ता पोंभुर्णा जि चंद्रपूर ,  कैलास भाऊजी गेडाम  रा पिपरी देशपांडे ता पोतर्न जि चन्द्रपुर,   गजानन चिन्ना जंपलवार रा लक्ष्मणपुर ता.चामोर्शी जि. गडचिरोली अशी  अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 
 घटनास्थळावरून १२ जिवंत कोंबडे , १२ कात्या,  ६ दुचाकी  जपत करण्यात आल्या आहेत.  एकूण दोन लाख एक हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून आरोपींवर    कलम १२ (ख) महाराष्ट्र जुगार प्रतिबंद कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही आष्टी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संघरक्षित फुलझेले, संजय गोंगले, उमेश किरमिरवार, पोलीस शिपाई गजानन ढेगडे,  गजानन ठाकूर, बालाजी येलकुंचिवार, रविकांत विरोकर, रत्नदीप जगझापे ,चोधरी , निखिल पेद्दीवर  आदींनी केली.  आरोपींना ४१(१)( अ)  नुसार नोटीस देऊन सोडण्यात आले. 

जप्त केलेल्या दुचाकी 

1) होंडा 100 MH33- Y 1609
2) टी वि एस व्हिक्टर 
MH33- E- 3220
3) बजाज डिस्कवर 
MH34- AF -1671
4) हीरो होंडा CD 100 
MH33-B-6442
5) बजाज CT 100 नंबर नसलेली
6) बजाज पल्सर  
MH33-U-7915 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-23


Related Photos