महत्वाच्या बातम्या

 तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित शिष्यवृत्तीचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : महाविद्यालयाकडे सण - २०११-१२ ते २०१७-१८ या वर्षातील तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित राहिलेले शिष्यवृत्तीचे प्रस्ताव संपूर्ण कागदपत्रांसह ३० नोव्हेंबर पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात सादर करावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी केले आहे.
सण २०११-१२ ते २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीचे काही अर्ज तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित आहे. यामुळे पुढील शिक्षणाकरीता आर्थिक अडचण निर्माण होण्याची शक्यता असल्याने पात्र विद्यार्थ्याना प्रलंबित शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्याकरीता तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित राहिलेल्या अर्जाचे अन्वेशन प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयात सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे तत्काळ शिष्यवृत्तीचे प्रस्ताव सादर करावे असे, समाज कल्याण विभागाने कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos