महत्वाच्या बातम्या

 जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हिंगणघाट मतदार संघातील लोकसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीचा घेतला आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ करिता होणाऱ्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर हिंगणघाट मतदार संघामध्ये पुर्वतयारी सुरु झालेली आहे. या पुर्वतयारीचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तहसील कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आढावा घेतला.

वर्धा लोकसभा अंतर्गत हिंगणघाट मतदार संघाच्या मतदान झालेल्या मतदान यंत्राची साठवणुक त्याची सुरक्षा व त्या अनुषंगाने तहसिल कार्यालय हिंगणघाट येथे तयार करण्यात आलेल्या सुरक्षाकक्ष व यंत्रणेचा तसेच लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा तहसील कार्यालयात सभा घेऊन आढावा घेतला. यावेळी  बैठकीला उपजिल्हानिवडणूक अधिकारी अनिल गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, तहसिलदार सतिश मासाळ, समुद्रपूरचे तहसिलदार कपील हाटकर व पोलीस निरीक्षक गभणे हे उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणूकीकरीता निवडणुक आयोगाचे निर्देशानुसार विधानसभा स्तरावर होणाऱ्या प्रचार प्रसिध्दी करिता मतदान यंत्रे प्राप्त झाली आहेत. तसेच २ फिरते प्रात्यक्षिक वाहनाव्दारे मतदार संघामध्ये गावोगावी जाऊन जनतेमध्ये मतदार जनजागृती व मतदान यंत्र हाताळणी कसे करावे. या बाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता विशेष मोहिम राबवुन प्रचार प्रसिध्दी करण्यात येत आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी मतदान करणेकरिता मतदार यांदीमध्ये नाव नोंदविण्याची मोहिम सुरु असुन अजुनही ज्यांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ठ नाही. त्यांनी जवळच्या मतदान केंद्रावर किंवा तहसिल कार्यालयात जाऊन मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos