महत्वाच्या बातम्या

 समाजकार्य महाविद्यालय गडचिरोली येथे प्राचार्य स्व. रमेशचन्द्र मुनघाटे यांची जयंती साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

गडचिरोली / गडचिरोली : स्थानिक श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था अंतर्गत फुले - आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली येथे सांस्कृतिक विभागातर्फे श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्थेचे संस्थापक प्राचार्य स्व. रमेशचंद्र मुनघाटे यांची 73 वी जयंती साजरी करण्यात आली. 

सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक प्राचार्य स्व. रमेशचंद्र मुनघाटे यांच्या प्रतिमेला मालार्पण करून अभिवादन करण्यात आले. 

तसेच संस्थेचे संस्थापक प्राचार्य स्व. रमेशचंद्र मुनघाटे यांच्या जयंती प्रित्यर्थ महाविद्यालयातील ग्रंथालय विभागातर्फे ग्रंथप्रदर्शनी आणि प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटक म्हणून गडचिरोली जिल्ह्याचे आमदार डॉ. देवराव होळी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस के खंगार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सिनेट सदस्य प्रा. डॉ. विवेक गोर्लावार, प्रा. डॉ. रुपेंद्रकुमार गौर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे संस्थापक प्राचार्य स्व. रमेशचंद्र मुनघाटे यांचे जीवनकार्य माहित व्हावे या उद्दांत हेतूने जीवनकार्यावर आधारित प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले. 

कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. डॉ. वर्षा तिडके यांनी मानले.

सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रंथालय विभागाचे कर्मचारी, महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच  विस्तार ग्रंथालयाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos