महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली येथे वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात २३ फेब्रुवारी रोजी वैराग्यमुर्ती गाडगे महाराज यांची १४६ वी जयंती साजरी करण्यात आली. 

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक अजय वानखेडे, प्रा.डॉ. राकेश चडगुलवार, आनंद चौधरी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गाडगेमहराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पन व दिप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. गाडगेबाबा  यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना संजीव गोसावी म्हणाले, गाडगे बाबा एक थोर समाज सुधारक होते ते आपल्या कृतीतून समाजाला संदेश देत असत. स्वच्छतेचे उपासक, महामानव, दलितांचे कैवारी, गरिबांचे सेवेकरी म्हणून त्यांची खरी ओळख होती. ते स्वच्छतेबाबत  नेहमी जागरूक असत म्हणून त्यांनी आयुष्यभर गावोगावी फिरून स्वच्छता तर केलीच शिवाय कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मनेही साफ करण्याचे काम त्यांनी केले.

यावेळी वर्ग ९ च्या काही विद्यार्थ्यांनी गाडगेबाबा यांच्या जीवनावर भाषण केले, तर उपस्थित मान्यवरांनी सुद्धा यावेळी गाडगे बाबांबद्दल विचार मांडले. विद्यालयातील वर्ग ७ चे विद्यार्थ्यानी गाडगे बाबांची गीतं सादर केली. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाने संपूर्ण शालेय परिसर दुमदुमून गेला होता.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र कोरे यांनी तर आभार प्रा. संदीप कोटांगले यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos