महत्वाच्या बातम्या

 ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानतर्फे २४ फेब्रुवारी रोजी वार्षिक पुरस्काराचे वितरण  


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानतर्फे २४ फेब्रुवारी रोजी वार्षिक पुरस्काराचे वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. 

पशुवैद्यकीय महाविद्यालय येथील सभागृहात सकाळी १० वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल. 

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समारंभास राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वासेकर, माजी कुलगुरु डॉ. पंकज चांदे हे उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.  





  Print






News - Nagpur




Related Photos