महत्वाच्या बातम्या

 १२ व्या अखिल भारतीय पोलीस तिरंदाजी स्पर्धेत गडचिरोली पोलीस दलाच्या अधिकाऱ्याने पटकावले कांस्य पदक


- पोस्टे आरमोरी येथे कार्यरत असलेले पोउपनि सुरज अनपट यांची यशस्वी कामगिरी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्हा माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशिल जिल्हा असून गडचिरोली पोलीस दलातील पोलीस जवान हे या दुर्गम अतिदुर्गम भागात आपली सेवा बजावत विविध कलागुण जोपासत असतात. ३० जोनवारी ते ०४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान बैंगलोर (कर्नाटक) येथे पार पडलेल्या १२ व्या अखिल भारतीय पोलीस तिरंदाजी स्पर्धेत गडचिरोली पोलीस दलातील पोरटे आरमोरी येथील कार्यरत असलेल्या पोउपनि सुरज सुनिल अनपट यांनी इंडियन राउंड प्रकारात महाराष्ट्र पोलीस संघाचे नेतृत्व करत कांस्य पदक प्राप्त केले. कांस्य पदकासाठी महाराष्ट्र पोलीस संघाने आयटीबीपी संघाचा ६-४ अशा फरकाने पराभव केला.

पोउपनि सुरज अनपट यांच्या या यशस्वी कामगिरी करिता पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. यावेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश यांनी देखील पोउपनि सुरज अनपट यांना शुभेच्छा दिल्या.





  Print






News - Gadchiroli




Related Photos