संचमान्यतेला स्थगिती , विद्यार्थी संख्येअभावी शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत


वृत्तसंस्था / मुंबई :  सप्टेंबर अखेरीस होणाऱ्या  संचमान्यतेला शालेय शिक्षण विभागने स्थगिती दिली आहे. त्यामुळे यावर्षी विद्यार्थी संख्येअभावी शिक्षक अतिरिक्त  होणार नसून शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
दरवर्षी संचमान्यतेनंतर अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढत आहे. या शिक्षकांचे इतर शाळांत समायोजन होत नसल्याने अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यात आणखी भर नको म्हणून यंदाची संचमान्यता न करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत. वर्ष २०१८ -१९ च्या संचमान्यतेनुसार यापूर्वी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरच राज्यातील शाळांची २०२० - २१ ची संचमान्यता करण्यात यावी, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. अनेक शिक्षक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-09-21


Related Photos