महत्वाच्या बातम्या

 सदानंद बोरकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सम्मानित 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारने, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभाग मुंबई आयोजित झाडीपट्टी सांस्कृतिक महामोहोत्सवाचे मूल येथे आयोजन करण्यात आले. 

मोहोस्तवाच्या उदघाटनाच्या भव्य सोहोळ्यात जेष्ठ रंगकर्मी, चित्रकार तथा नाट्य लेखक सदानंद बोरकर यांना सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले. 

यावेळी मंचावर विदर्भाच्या बहिणा, अंजना खुणे आणि पद्मश्री डॉ. परशुराम खुणे प्रामुख्याने उपस्थित होते. गत चाळीस वर्षांपासुन चित्रकारीता, अभिनय, दिग्दर्शन, नाट्य लेखन करून सदानंद बोरकर यांनी कलाक्षेत्रात फार मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या नाटकाने झाडीपट्टी रंगभूमीच्या सीमा ओलांडून सार्क इंटरनॅशनल थिएटर पर्यंत मजल मारली आहे. चित्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःची शैली निर्माण करून पारंपरीक जीवन शैलीला व ग्रामीण घटकांना रेखाचित्रांच्या माध्यमातून जगभर पोचवलेले आहे. त्यांची सर्वच नाटके समाज जागृतीचे सामाजिक काम करतात. गोंडवाना विद्यापीठाला त्यांची नाटके शिकविली जातात. माझे कुंकू मीच पुसले, आत्महत्या, गंगाजमुना, अस्सा नवरा नको गं बाई ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.

अशा या हरहुन्नरी कलावंताला या महा मोहोत्सवात जीवन गौरव देऊन गौरविण्यात आल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos