विधानसभा निवडणूकीची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता, निवडणूक आयोगाने बोलावली पत्रकार परिषद


वृत्तसंस्था / नविदिल्ली : महाराष्ट्र आणि हरीयाणा विधानसभा निवडणूकांंच्या तारखा आज जाहिर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शनिवारी पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूकांच्या तारखा जाहिर केल्या जाऊ शकते. तसेच आचारसंहीता सुध्दा लागू होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  महाराष्ट्रात जोरदार घमासान सुरू आहेत. सभा, कार्यक्रम सुरू आहेत. भूमिपुजनाचे कार्यक्रम सुरू आहेत. आज निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर आचार संहीता लागू केल्यास या सर्व सभा, कार्यक्रमांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

 आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी झाल्यानंतर दोन्ही राज्यातील सरकारांना कोणतीही नवीन घोषणा करता येणार नाही किंवा कोणतीही नवीन योजना राबवण्याचे अधिकार त्यांना नसणार आहेत. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे मतदारांना लुबाडण्यासाठी किंवा त्यांचा प्रभाव पाडण्यासाठी सरकारला आपला अधिकार वापरण्यास मनाई असणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र आणि हरियाणामधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या खर्चावर नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने प्राप्तिकर विभागाच्या ११० आयआरएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. या दोन राज्यांमधील निवडणूक प्रक्रियेदरम्यान काळ्या पैशांचा वापर आणि इतर बेकायदेशीर विनंत्यांचा तपास करण्याचे काम या निरीक्षकांना देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यापुर्वीच सांगितले. केंद्रीय निवडणूक आयोगाने २३ सप्टेंबर रोजी या अधिकाऱ्यांना बोलावले असून, त्यांना यासंदर्भात कळवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (सीबीडीटी) या अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या काळात आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडता यावे यासाठी त्यांना पदभारमुक्त करण्यासाठी सांगण्यात आले आहे.  Print


News - World | Posted : 2019-09-21


Related Photos