ग्रामीण रुग्णालय कोरची येथील १०२ रुग्णवाहीकेला 'दे धक्का'


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची :
येथील ग्रामीण रूग्णालयात १०२ क्रमांकाच्या  २ रूग्णवाहिका देण्यात आल्या  असुन मागील कित्येक दिवसापासून दोनही रूग्णवाहिका बंद अवस्थेत आहेत.  त्यापैकी १ कोरची येथील ग्रामीण रूग्णालयात भंगार अवस्थेत पडुन आहे व दूसरी रूग्णवाहिका कित्येक महिन्यापासुन चंद्रपुर येथे दुरुस्तीला गेली असल्याचे सांगण्यात आले.  ज्याकडे संबधित विभागाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.
  दोनही रूग्णवाहिका बंद असल्याची बातमी काही महिन्यापूर्वी प्रकाशित केल्यामुळे  पर्यायी व्यवस्था म्हनुन कुरखेडा येथिल रूग्णवाहिका ग्रामीण रूग्णालय कोरची येथे देण्यात आली असुन रूग्णाला बसविन्यापूर्वी धक्का देऊन सुरु  करा अशी अवस्था त्या रूग्णवाहीकेची झाली आहे. तर रूग्णाने दाखल होण्यापूर्वी रूग्णवाहिकेला धक्का मारून गाड़ीमध्ये बसायचे काय असा प्रश्न लोकांच्या मनात उद्भवत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-21


Related Photos