महत्वाच्या बातम्या

 कुरखेडा येथे मधमाशा पालन जनजागृती मेळावा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय गडचिरोली अंतर्गत मध केंद्र योजनेखाली कुरखेडा येथे उमेद व पंचायत समिती यांचे संयुक्त विद्यमाने नुकतेच मधमाशा पालन जनजागृती मेळावा संपन्न झाला.

केव्हीकेचे शास्त्रज्ञ पुष्पक बोथीकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यमाला उमेदच्या समन्वयक एस.एस.मारेकरी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान रोजगार निर्मीती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम, पी एम विश्वकर्मा तसेच मधमाशा पालन उद्योगाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. मधमाशा पालन या उद्योगाबाबत कुंभरे यांनी मधमाशीच्या मधपेटीवर प्रात्याक्षीकसह माहिती दिली.

कुरखेडा येथील मधोत्पादक जगदीश दखने यांनी आग्या मधमाशी बद्दल तसेच मधमाशा पालन करणे कसे सोईचे आहे याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी भास्कर मेश्राम यांनी प्रास्तावीक केले.

मेळाव्याचे सुत्रसंचालन पी.व्ही.कुंभरे मधुक्षेत्रीक यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक चव्हाण, पर्यवेक्षक उद्योग यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता लखन गेडाम, औद्योगीक पर्यवेक्षक तसेच शैलेश गोतमारे यांनी सहकार्य केले असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos