महत्वाच्या बातम्या

 ६० आपदा मित्रांचा प्रशासनातर्फे गौरव आपदा मित्र महोत्सवाचा प्रारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : अतिवृष्टी, पूर, दुष्काळ अशा अनेक आपत्तीच्या परिस्थिती आपदा मित्र नेहमी मदत करतात.  त्यांच्या या कार्याची जिल्हा प्रशासनाने नोंद घेऊन उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे ६० आपदा मित्रांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवांकित केले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने स्व. वसंतराव देशपांडे सभागृहात आपदा मित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे व तहसीलदार संतोष कानडे व जयप्रकाश दुबळे यावेळी उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यकमाचा प्रारंभ झाला.

आपत्तीच्या वेळी आपदा मित्र व सखी धाऊन येतात. नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करतात. यामुळे जीवीत हानी व इतर हानी टाळण्यास मदत होते. त्यांनी वेळोवेळी संकटाच्या वेळी असे सहकार्य अपेक्षित असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी यावेळी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.

आपत्ती व्यवस्थापनाबाबत वेळोवेळी दिलेल्या प्रशिक्षणामुळे आपदा मित्र तरबेज झालेले आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या आपदेत त्यांनी हिरहिरीने भाग घ्यावा. त्यासोबतच आपत्ती व्यवस्थापनाबाबत नागरिकांनी माहिती देवून जनजागृती करा, असे त्यांनी सांगितले.  या महोत्सवात दत्ता मेघे मेडिकल कॉलेजचे कुलगुरु डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी ‘आपदा मित्रांची भूमिका’ या विषयावर व्याख्यान दिले.

यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय आपदा मित्रांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले. आपदा विषयक व्हिडिओ दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी केले.  

आपदा मित्र महोत्सवानिमित्त रॅली -

या महोत्सवानिमित्य सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय ते स्व. वसंतराव देशपाडे सभागृहादरम्यान रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुष खांडे, अंकुश गावंडे सहभागी होते.  या रॅलीत आपदा मित्र, आपदा सखी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   





  Print






News - Nagpur




Related Photos