महत्वाच्या बातम्या

 परस्पर समन्वयातून आदर्श आचारसंहितेत निवडणुका पार पाडण्यासाठी कटीबद्ध व्हा : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


- निवडणूक अंमलबजावणी यंत्रणातील वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : येणारी लोकसभा निवडणूक ही आदर्श आचारसंहितेत पार पाडावी यासाठी अंमलबजावणी यंत्रणातील सर्व संबधित अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. निवडणुकीची कार्यपद्धती, नियमावली व इतर वेळोवेळी निर्माण होणाऱ्या विविध अडचणींचा विचार करुन निवडणूक आयोगाने संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध करुन दिली आहे. याबाबत प्रशिक्षणही पार पाडली जात आहेत. नियमांचा काटेकोर वापर व्हावा यासाठी अधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन निवडणुकींच्या कामासाठी कटीबद्ध होण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

आगामी सार्वत्रिक निवडणूक- २०२४ अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील एकूण २२ पेक्षा जास्त अंमलबजावणी यंत्रणेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर व संबधित विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या सीव्हीजील ॲप व ई-एसएमएस (इलेक्शन सिझर मॅनेजमेंट सिस्टीम) याबाबत बैठकीत प्रशिक्षण देण्यात आले.

नागपूर जिल्ह्याला तेलंगणा व मध्यप्रदेशची लागून असलेली सीमा लक्षात घेता निवडणुकांमध्ये काही गैरप्रकार होणार नाही यासाठी संबधित मंडळ अधिकारी व पोलीस विभागाने अधिक खबरदारी घेतली पाहिजे. बँकामधून होणाऱ्या मोठ्या आर्थिक व्यवहाराबाबत दक्षता घेण्याच्यादृष्टीने बँकांना निर्देश देऊन त्याबाबतचा आढावा महत्वाचा आहे. राष्ट्रीय व सहकारी बँकांच्या कॅश व्हॅन यांना क्यूआर कोड लावणे बंधनकारक करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिल्या. आवश्यकता भासेल तशी आयकर विभाग व इतर खर्चाच्यादृष्टीने निघराणी ठेवण्यासाठी पोलीस विभाग वेळोवेळी पाठबळ देईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कॅफो विलीन खडसे व वेतन पडताळणी अधिकारी शैलेश कोठे यांनी प्रशिक्षण दिले.





  Print






News - Nagpur




Related Photos