महत्वाच्या बातम्या

 वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्हयामध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी १०० मुलांची क्षमता असलेली वसतिगृह शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून नागपूर येथे सुरू करण्यात येणार आहे. या वसतिगृहांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सन २०२३-२४ साठी मुलांच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्जाचे वाटप व स्विकृती सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर, श्रध्दानंदपेठ, नागपूर या ठिकाणी होणार आहे. अर्जाचे वाटप व स्विकृती ५ मार्चपर्यंत करण्यात येणार आहे. प्राप्त अर्जांवरून रिक्त जागांवर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येतील. वसतिगृह प्रवेशासाठी विहीत कालावधीमध्ये अर्ज सादर करणे आवश्यक असणार आहे.

इमाव ५१, विजाभज ३३, विमाप्र ६, दिव्यांग ४, अनाथ २, आर्थिक मागास प्रवर्ग ४ अशी शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी सामाजिक आरक्षणास मान्यता देण्यात आली आहे.

विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्जदार विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा कमी असावे. विद्यार्थी सन २०२३- २४ मध्ये व्यावसायीक/ बिना व्यावसायीक महाविद्यालयात प्रथम वर्षात पदवी अभ्यासक्रमास प्रवेशित असावा.  विद्यार्थी स्थानिक नसावा या पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत. पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत वसतिगृह प्रवेशासाठी सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करावे, असे जाहीर आवाहन सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos