महत्वाच्या बातम्या

 चामोर्शी माल येथे भीषण पाणीटंचाई : प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याकरिता गावकऱ्यांची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आरमोरी : तालुक्यातील चामोर्शी माल ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीमध्ये येणारे चामोर्शी माल येथे मागील तीन ते चार वर्षापासून पिण्याचे पाणी नसल्यामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. 

गावातील नागरिकांसोबतच गुरेढोरे शेळ्या व इतर पाळीव जनावरे यांना पिण्यासाठी पाण्याची समस्या निर्माण वारंवार होत आहे. या पाणी समस्येच्या बाबतीत ग्रामपंचायत कार्यालय तसेच सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांना वारंवार निवेदन देऊन माहिती देऊनही आत्तापर्यंत कोणत्याच प्रकारची उपाय योजना करण्यात आलेले नाही.
सदर पाणीटंचाई मिटवून देण्याविषयी गावातील नागरिकांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती आरमोरी तसेच मुख्या कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली तहसीलदार तहसील कार्यालय आरमोरी यांना २० फेब्रुवारी २०२४ रोजी निवेदन देऊन सदर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तत्काळ उपयोजना कराव्यात असे, निवेदन सुद्धा दिलेले आहेत. 

गावातील मुख्य चौकात असलेली विहीर गेल्या अनेक वर्षापासून त्या विहिरीचा पाणी फरवरी महिना लागल्याबरोबर कोरडी पडते, त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याचे पाण्याची भीषण पाणीटंच निर्माण झाले असल्याने प्रशासनाने तात्काळ या समस्येकडे लक्ष देऊन ती समस्या दूर करावी, अशी मागणी चामोर्शी माल येतील नागरिक गुणेश्वर बांनबले, गौरव लाकडे, किशोर भोयर, जीवन हनवते, निकेश बांनबले, निंबा लाकडे, कांता चौधरी, नलु गजबे, इनु गजबे, वर्षा बाणबले, ज्योती मेश्राम, कल्पना लाकडे, वैशाली लाकडे, किरण तिवाडे, रीना लाकडे, मालथा बानबले, आदी या गावातील लोकांनी निवेदनातून केलेली आहे. 

पाणीटंचाईवर तात्काळ उपाय योजना न केल्यास गावकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गावकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos