‘सांगा रस्ता शोधू कुठे ?’ चामोर्शी मार्गावर जिल्हा परिषद शाळेजवळ टॅक्टरची ट्राली पलटली


- रस्त्यांच्या दैनावस्थेने नागरीक बेजार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली  :
शहरातील रस्त्यांची एवढी गंभीर परिस्थिती आहे की, दररोज नवननिन प्रकरण समोर येत आहे.  काही दिवसांपासून मुख्य मार्गावर वाहने फसत आहेत. तर आज चक्क वर्दळीच्या ठिकाणीच रेती वाहतूक करणाऱ्या व रस्ता शोधत जाणाऱ्या टॅ्रक्टरची ट्राली पालटली. प्रचंड खड्डे असज्यामुळे  आता वाहनधारकांना ‘सांगा रस्ता शोधू कुठे ?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
इंदिरा गांधी चौकापासून तर शासकीय विज्ञान महाविद्यालयापर्यंत मुख्य मार्गावर रस्ता संपून आता रस्त्याच्या बाहेरही खड्डे पडायला लागले आहेत. तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी झोपेतच आहेत.  चामोर्शी मार्गावरील  चौकापासून जवळच प्लॅटीनम ज्युबली शाळा आणि जिल्हा परिषद हायस्कुल तसेच शिकवणी सेंटर, हॉस्पीटल आहेत.  याच परिसरात रस्त्याच्या आकारपेक्षाही मोठे खड्डे पडले आहेत. या ठिकाणी काही दिवसांपूर्वी ट्रकसुध्दा फसले होते. ऐन वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या खड्ड्यांमुळे आज ट्रॅक्टरची ट्राली पलटली. मात्र खड्ड्यांमुळे आधीच  नागरीक रस्ता शोधत जात असल्यामुळे जवळपास कुणीही नव्हते. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.  रस्त्यांची अत्यंत दयनिय अवस्था असल्यामुळे बरेचसे नागरीक या मार्गाने जाणेसुध्दा बंद करीत आहेत. प्रशासन मात्र सुस्त असून आणखी किती वाहनांच्या अपघातांची वाट पाहत आहे ? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-20


Related Photos