महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना सैनिकी विद्यालयात शिवाजी महाराज यांची जयंती साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना सैनिकी विद्यालयात १९ फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य  संजीव गोसावी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे, प्रा.डॉ. राकेश चडगुलवर, ज्येष्ठ शिक्षक, सुरेश रेचनकर संतोष बोबाटे हे होते. दिपप्रज्वलानानंतर महाराष्ट्रगीत जय जय महाराष्ट्र माझा हे गीत सामुहिक रित्या गायन करण्यात आले. प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर भाषण केले.

शिवाजी महाराजांना मोठी दूरदृष्टी होती. स्वराज्यासाठी काय काय केले जाऊ शकते, याचा विचार त्यांच्याकडे होता. स्वराज्य स्थापनेनंतर ते विस्तारले कसे जाईल, याचा ते सदैव विचार करत असत. त्यांनी बांधलेले गडकिल्ले हे याचे उत्तम उदाहरण आहे. हे गडकिल्ले इतके अभेद्य असत की, शत्रूला त्यावर चाल करून जाताना हजारदा विचार करावा लागे. किल्ल्यांभोवतीची तटबंदी मजबूत असे आणि त्यासाठी किल्ल्यावर केलेल्या खोदकामांतून मिळालेलेच दगड वापरले जाते. त्यामुळे इतक्या उंचावर इतके अभेद्य किल्ले बांधता आले. शत्रूचा धोका जसा जमिनीवर आहे तसाच तो पाण्याच्या बाजूनेही असू शकतो, या दूरदृष्टीतून त्यांनी जलदुर्गांची निर्मिती केली. हा संपन्न वारसा आजही महाराष्ट्र अभिमानाने मिरवत आहे. तर  गनिमी कावा हे शिवाजी महाराजांचे प्रमुख हत्यार होते. अनेक मोहिमा, लढाया शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करून जिंकल्या होत्या. शत्रूचे सैन्य कितीही प्रचंड असले तरी काही मावळ्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी शत्रूचा पाडाव केला. स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले बांधले आणि जिंकले. हिंदवी स्वराज्यात शिवाजी महाराजांकडे ४०० गड-किल्ले होते, यातील अनेक गड किल्ले आज देखील जशेच्या तशे आहेत. शिवाजी महाराजांनी अनेक कष्टाने ते किल्ले जिंकले आहेत.

जर शिवाजी महाराजांचे कर्तुत्व आत्मसात करायचे असतील तर त्यांच्या दाखवून दिलेल्या मार्गावर चालणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य संजीव गोसावी यांनी केले. 

शिवजयंती निमित्य उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे, प्रा.डॉ. राकेश चडगुलवर, ज्येष्ठ शिक्षक सुरेश रेचनकर संतोष बोबाटे, यांनीही विद्यार्थ्यान मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos